Chakan News : चाकणमध्ये किराणा मालाच्या दुकानातून दीड लाखाचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला गुटखा सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून पकडला. चाकण येथे गुरुवारी (दि. 11) सकाळी ही कारवाई करण्यात आली. यात एक लाख 55 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

दिनेश अंबादास सोळंके (वय 25, रा. कडाचीवाडी, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत पोलीस नाईक अनिल महाजन यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश याचे कडाचीवाडी येथे किराणा मालाचे दुकान आहे. त्याने दुकानात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी दुकानावर बुधवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास छापा मारला. दुकानातून एक लाख 55 हजार 388 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.