Chikhali : गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 26 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका स्कॉर्पिओ कारमधून 26 हजारांचा गुटखा जप्त केला. तसेच गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 9) चिखली येथे करण्यात आली.

गणेश नंदाराम चाैधरी (वय 35),  राजु गणाराम चाैधरी (वय 25, दोघे रा. कुदळवाडी, चिखली), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक चिखली परिसरात गस्त घालत होते. गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक नितीन लोखंडे यांना माहिती मिळाली की, ज्ञानदीप बंगल्यासमोर सार्वजनीक ठिकाणी स्कॉर्पिओ कार (एम एच 14 / जे एल 2266) उभी आहे. त्यामध्ये गुटखा असून दोघेजण तो गुटखा विक्रीसाठी घेऊन जात आहेत. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कार मधून 256 हजारांचा गुटखा आणि साडेपाच लाखांची स्कॉर्पिओ कार असा एकूण पाच लाख 76 हजारांचा ऐवज जप्त केला.

दोन जणांना अटक केली असून त्यांना पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औंधचे सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.