Chikhali Crime News : गुटखा विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा; एकजण अटकेत

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्री प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून गुटखा विक्रीसाठी दुकान उपलब्ध करून देणाऱ्या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 14) सकाळी रुपीनगर येथे करण्यात आली.

मांगीलाल कुपारामजी सोळंकी (वय 40, रा. रुपीनगर, तळवडे), ओमजी बिष्णोई (वय 45), दिलीप धाड (वय 40, रा. रुपीनगर, तळवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंबंधी पोलीस हवालदार संतोष बर्गे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मांगीलाल याने दिलीप धाड यांच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका दुकानात गुटखा विक्रीचे दुकान सुरू केले. याबाबतची माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत मांगीलाल याला अटक केली. दरम्यान, मांगीलाल यास दुकान उपलब्ध करून दिल्या प्रकरणी ओमजी आणि दिलीप या दोघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.