Chakan News : चाकण येथून 2 लाख 94 हजारांचा गुटखा जप्त, पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज  –  चाकण येथे एका कार मधून तब्बल (Chakan News) 2 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. हि कारावाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनीट तीनच्या पथकाने मंगळवारी (दि.21) केली.

 

या कारवाईत पोलिसांनी संदिप उमाशंकर द्विवेदी (वय 27 रा.खेड), मोहन रामनरेश गुप्ता (वय 21 रा. चाकण), सुमित विनोदकुमार इटोदिया (वय 26 रा.खेड),लवकुश कमलेश लाक्षकार (वय 25 रा.खेड) व संतोष उमाशंकर द्विवेदी (वय 28 रा.चाकण) अशा पाच जणांना अटक केली आहे.

 

Pune News : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई समिर काळे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, चाकण येथे आळंदी फाटा (Chakan News) येथूल एका सलुन समोर काही जण कारमध्ये गुटखा घेऊन येणार आहेत. पोलिसांनी तेथे जाऊन पाच जणांना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळील स्वीफ्ट कार व एका दुचाकीवर विक्री करीता पोत्यात घेऊन जात असलेला 2 लाख 94 हजार 610 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला.

 

यावेळी पोलिसांनी गुटखा, कार, दुचाकी असा ऐकूण 11 लाख 54 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  चाकण पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

हि कारवाई गुन्हे शाखा युनीट तीनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शालेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार सचिन मोरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, (Chakan News) योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधीर दांगट, शशिकांत नांगरे, समिर काळे, रामदास मेरगळ, महेश भालचिम, निखिल फापाळे, तांत्रिक तपास नागेळ माळी यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.