Punawale : पुनावळेतून 44 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुनावळे येथे छापा टाकत 44 लाख 42 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. (Punawale) हि कारवाई रविवारी (दि.19) करण्यात आली असून एकाला याप्रकऱणी अटक केली आहे.

महेंद्र कुमार कान्हाराम परमार (वय 25 रा. हिंजवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमंली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व मितेश यादव यांना बातमी मिळाली की, पुनावळे येथील स्मार्ट बाजारच्या मागे (Punawale) पत्राशेड मध्ये गुटख्याचा मोठा साठा करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता पोलिसांनी परमार याला ताब्यात घेतले. यावेळी वेगवेगळ्या कंपनीचा  44 लाख 42 हजार 49 रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला.

 

Pimpri News : युवक काँग्रेसचा मंगळवारी विधानसभेला घेराव

 

हा जप्त माल कैलास राठोड व महेंद्र राठोड दोघे राहणार हिंजवडी यांचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानुसार तीनही आरोपींवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हि कारवाई अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतिश पवार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब सुर्यवंशी, (Punawale) पोलीस हवालदार प्रदिप शेलार, पोलीस हवालदार संतोष दिघे, पोलीस हवालदार संदिप पाटील, आनंद बनसोडे, पोलीस नाईक मनोज राठोड, मयूर वाडकर, विजय दौंडकर, पोलीस शिपाई रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.