Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापीवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली

एमपीसी न्यूज – वकील आजारी असल्याने सर्वेच्च् न्यायालयातील ज्ञानवापीवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ज्ञानवापीवर उद्या (शुक्रवारी) दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. तसेच हिंदू पक्षांचे वकील विष्णू जैन यांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

 

आपलं उत्तर मांडण्यासाठी उद्यापर्यंतची वेळ देण्याची मागणी त्यांनी केली होती.तर या प्रकरणावर तात्काळ सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम पक्षकाराने केली होती.मात्र कोर्टाने हिंदू पक्षकारांना म्हणणं मांडण्यासाठी एक दिवसाचा अवधी दिला आहे.तसेच सर्वोच्च न्यायालयाने वाराणसी कोर्टातील सुनावणीला स्थगिती दिली आहे.हिंदू पक्षकारांनी मागणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे वाराणसी कोर्टातही सुनावणी होणार नाही.

 

न्यायालयाचे आयुक्त विशाल सिंह यांनी ज्ञानवापी मशिदीतील 15 पानी अहवाल न्यायालयासमोर सादर केला आहे. हा अहवाल सीलबंद कव्हरमध्ये असून तो रवीकुमार दिवाकर यांच्या न्यायालयात सादर केला आहे.सोबत तीन सीलबंद बॅक्सेस आहेत.ज्यात आतील व्हिडीओ रेकार्डिंग,फोटो,मेमरी चीप आणि इतर साहित्य आहे. त्यामुळे या अहवालात नेमकं काय म्हटलंय,याकडे सर्वांचे लक्ष लांगलं आहे.

 

सुनावणी पुढे ढकलण्याचे कारण काय

ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांना दम्याचा अटॅक आल्याने ते रुग्णालयात अडमिट आहेत.त्यामुळे या प्रकरणावरची सुनावणी उद्यावर ढकलावी अशी मागणी वकील विष्णू जैन यांनी केली होती.मात्र आमचं म्हणणं आजच ऎकून घ्यावं, असा आग्रह मुस्लिम पक्षकारांच्या वकीलांनी धरला.कनिष्ठ न्यायालयात भिंत तोडण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणावर आजच सुनावणी झाली पाहिजे. अशी मागणी मुस्लिम पक्षकारांचे वकील हुफैजा अहमदी यांनी केली. त्यावर सरन्यायाधीशांनी याप्रकरणावर उद्या सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं. उद्या सर्वोच्च न्यायालयात 50 प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मला माझ्या सहकारी न्यायाधीशांशी चर्चा करावी लागेल,असं सरन्यायाधीशांनी सांगितले,तर हुजैफा यांनी अन्य मशिदींनाही सील करण्याचे अर्ज दिले गेले आहेत, याकडे कोर्टाचे लक्ष वेधलं. दोन्ही बाजू ऎकून घेतल्यावर कोर्टाने उद्या तीन वाजता सुनावणी ठेवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.