Bhosari : भाडे वाढवून न दिल्याने जिमची तोडफोड; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – भाडे वाढवून न दिल्याने जिमचे कुलूप तोडून तोडफोड केली. दोन लाखांचे नुकसान करून टेबलच्या ड्रॉवरमधून रोख आठ हजार रुपये काढून घेऊन चोरून नेले. तसेच जिमला दुसरे कुलूप लावले. ही घटना 25 जानेवारी ते 14 मार्च दरम्यान भोसरी येथे घडली.

अनिल अशोक फुगे (वय 38, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 14) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत पोपट फुगे (वय 35), सम्राट पोपट फुगे (वय 30, दोघेही रा. दिघी रोड, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल फुगे हे जिम ट्रेनर आहेत. त्यांनी जिमचे भाडे वाढवून दिले नाही म्हणून आरोपी प्रशांत व सम्राट यांनी त्यांच्या जिमचे कुलूप तोडून स्वत:चे कुलूप लावले. तसेच जिममधील पीओपी, कारपेट तोडून जिमची मशिनरी टेरेसवर टाकून त्या तोडून दोन लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच टेबलच्या ड्रावरमधून आठ हजार रुपये काढून चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.