BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : एच.ए. स्कूलमध्ये रंगली पुस्तक ‘दहीहंडी’

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने आयोजन 

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने पिंपरीतील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच. ए.) शाळेत ‘पुस्तक दहीहंडी’चे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. 

एच.ए स्कूलच्या प्रांगणात आज (शुक्रवारी) झालेल्या या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष बाळासाहेब उ-हे, शाळाप्रमुख एकनाथ बुरसे, रोटरीचे अनिल नेवाळे, सुशील अरोरा, अलकनंदा माताडे, कमलजीत कौर, उषा उ-हे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र पडवळ, सचिव राधा जाधव, ज्योती घाडगे उपस्थित होते.

रोटरीचे अध्यक्ष बाळासाहेब उ-हे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. पुस्तकाचे वाचन हे ज्ञान मिळविण्यासाठी उपयुक्त येते. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची आवड लागावी. त्यामध्ये रुची निर्माण व्हावी. यासाठी आगळ्यावेगळ्या आणि नावीन्यस्वरुपात पुस्तक ‘दहीहंडी’ साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या उपमुख्याध्यापिका स्मिता करंदीकर यांनी केले.  सूत्रसंचालन अनिता भामरे यांनी केले.

.