Pimpri News : ‘एचए’च्या जागेत होणार क्षेत्रीय व झोनल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय

एमपीसी न्यूज – पिंपरीतील हिंदुस्तान एंटीबायोटिक लिमिटेड कंपनीच्या जागेत क्षेत्रीय व झोनल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कार्यालय होणार आहे. नुकतेच या जागेचा व्यवहार व नोंदणी पूर्ण झालीय. त्यामुळे झोनल कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय पुणे -1 (गोळीबार मैदान) व क्षेत्रीय कार्यालय पुणे -2 (आकुर्डी) या सर्वांचे कामकाज एकाच ठिकाणा वरून चालणार असून, नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना क्षेत्रीय कार्यालय पुणे-2 यांच्यावतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

तिन्ही कार्यालयासाठी हिंदुस्तान एंटीबायोटिक कंपनीकडून साडेतीन एकर जमीन 42.06 कोटी रूपयांना खरेदी करण्यात आली आहे. गुरूवारी (दि.13 जानेवारी 2022) जमीनीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिन्ही कार्यालय एकाच ठिकाणी येणार असल्याने सभासदांना फायदा होणार आहे.

यासाठी आकुर्डी कार्यालयाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त -I रवींद्र कुमार, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त -II मितेश राजमाने, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त -II आशुतोष, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त -II सचिन बोराटे, अशोक गेंगजे, दिनेश शेलार, आलोक कुमार, पंकज नेमा, हेमराज मेहरा, संदीप अखोरी प्रसाद, एम के मिश्रा, बिपीन कुमार यांनी योगदान दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.