Maval News : वारकरी संप्रदाय मंडळाच्या आंदर मावळ विभागीय अध्यक्षपदी हभप दीपक वारींगे

एमपीसी न्यूज – वारकरी संप्रदाय मंडळाच्या मेळाव्यात आंदर मावळ विभागीय अध्यक्षपदी वारंगवाडी मावळ येथील हभप दीपक रावजी वारींगे, नाणे मावळ विभागीय अध्यक्षपदी कान्हे येथील हभप देवराम सतु सातकर, तर पवन मावळ विभागीय अध्यक्षपदी भडवली येथील हभप शांताराम किसन लोहोर यांची निवड करण्यात आली. तसेच विभाग प्रमुख व ग्रामप्रतिनिधींचीही नियुक्ती करण्यात आली. याबाबतची घोषणा तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष हभप नंदकुमार भसे व कार्यकारणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. 

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने मार्गदर्शन मेळावा व नियुक्ती पत्रे प्रदान समारंभ घेण्यात आला. तसेच वारकरी मंडळाच्या माध्यमातून धर्म जोपासना, आध्यात्मिक व सामाजिक कार्य घडावे, या उद्देशाने तालुक्यात महिनाभर नवीन सभासद अभियान राबविण्यात आले. ‘गाव तेथे सभासद या संकल्पनेतून प्रत्येक गावात ग्रामप्रतिनिधींची निवड करण्यात आली.

नवीन ग्राम प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी कान्हे येथील साईबाबा सेवाधाम प्रकल्पात शंकर महाराज मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात महाराष्ट्र-छत्तीसगड हिंदू जनजागरण समितीचे संघटक सुनील घनवट, राजस्थान वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष रमेशसिंह व्यास व भास्करराव खैरे यांनी संघटनात्मक आध्यात्मिक कार्याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, भारतीय किसान संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, ज्ञानेश्वर महाराज ठाकर, मुकुंद नाना राऊत, देवराईचे अध्यक्ष सुकन बाफना, रघुनाथ महाराज लोहोर, माऊली शिंदे, संतोष कुंभार, तुकाराम गाडे, मधुकर महाराज गराडे आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विभागीय अध्यक्ष, विभाग प्रमुख, ग्रामप्रतिनिधी म्हणून 350 सभासदांना नियुक्ती पत्रे प्रदान करून सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या निवडींमुळे विभागीय अध्यक्षांचे संपुर्ण तालुक्यात अभिनंदन व कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.