-MPC-TOP-MOST-BANNER-I

Hadapsar -विक्रीसाठी आणलेल्या 5 पिस्तूलांसह 12 जीवंत काडतुसे जप्त

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- हडपसर पोलिसांनी तिघा सराईतांना अटक करून त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या 5 पिस्तुलांसह 12 जीवंत काडतुसे आज सोमवारी (दि.3) दुपारी 2 च्या सुमारास फुरसुंगी रेल्वे पुलाजवळून जप्त केली.

नामदेव अंबादास शिंदे(वय 23,रा.फुरसुंगी), बच्चन दिवानसिंग चावला (वय 33, रा.बलवडी, मध्यप्रदेश), अक्षय रवींद्र महाले(वय 23, रा.बलवडी, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपिंची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना हडपसर परिसरात गस्त घालत असताना बतमीदारकडून एकजण पिस्तुल विक्रीसाठी फुरसुंगी येथील रेल्वे पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता मिळालेली माहिती खरी असल्याचे उघड झाले.त्यानंतर पोलिसांनी तिथे असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी 5 पिस्तुले नामदेव शिंदे याला विकण्यासाठी आणल्याचे सांगितले.आरोपींकडून 1 रिव्हॉल्व्हर 4 पिस्तुले आणि 12 जिवंत काडतुसे असा तब्बल 2 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.