Hadapsar : प्रवासात ड्रायव्हरने चोरलेले 13 तोळे सोने मिळाले परत

एमपीसी न्यूज – बंद घरातून दागिने चोरी जातील (Hadapsar) या भीतीने प्रवासात सोबत घेतलेले 15 तोळ्यांचे दागिने ड्रायव्हरने चोरले होते. हडपसर पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली असून त्याच्याकडून 13 तोळ्यांचे दागिने जप्त केले आहेत.

जमील अयुब शेख (वय 45 रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवजीराव पाटील (वय 70) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात 2 जून रोजी तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे कर्नाटकातील बीदरला जाण्यासाठी निघाले असता त्यांचा नेहमीचा ड्रायव्हर नसल्याने त्यांनी शेख याला बोलावले. यावेळी घरातील 15 तोळे सोने त्यांनी खबरदारी म्हणून सोबतच बॅगेत घेतले होते. बीदर येथील कार्यक्रम झाल्यावर पाटील परत पुण्याला आले असता त्यांच्या लक्षात आले, की बॅगेत सोनेच नाही.

Hadapsar Burglary News : जावयाने घरफोडी करीत चोरले 7 तोळ्यांचे दागिने

त्यांनी तातडीने (Hadapsar) पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, त्याचा कोणताही फोटो किंवा ओळख पटवणारी खून पाटील यांच्याकडे नव्हती. हडपसर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपी दापोडी येथील राहणार असल्याचे शोधून काढले व शेखला अटक केले. यावेळी त्याच्याकडून 13 तोळे वजनाचे दागिने आणि 65 हजार रुपये रोख जप्त केले. हडपसर पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.