Hadapsar : पुर्ववैमनस्यातून अल्पवयीन तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून पाच ते सहा जणांच्या ( Hadapsar) टोळक्याकडून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करणात आला आहे. हा खून रविवारी (दि.17) रात्री हडपसर येथे घडला आहे.या प्रकरणातील आरोपींना ह़डपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Pune : ससून हॉस्पिटलने केली पहिली रोबोटिक गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया
स्वप्नील विठ्ठल झोंबर्डे (वय 17 रा. मिरेकर वस्ती , हडपसर )असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकऱणी विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय – 46 वर्षे , रा. मिरेकर वस्ती , हडपसर, ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी सनी रावसाहेब कांबळे (वय -25), अमन साजिद शेख,(वय 22), आकाश हनुमंत कांबळे, (वय -23) व त्याचे तीन अल्पवयीन साथीदार यांना अटक केली असून त्यांच्यावर खून व बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा स्वप्नील झोंबर्डे याला जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी संगनमत करून धारदार वार केले. स्वप्नील याच्या डोक्यावर वार करून जीवे ठार मारले तसेच सनी कांबळे व अमन शेख यांनी त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवून आमच्या सोबत कोणी पंगा घेतला तर असाच एकेकाचा मुडदा पाडू असे बोलून परिसरात दहशत पसरवली . हडपसर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपसा करत ( Hadapsar) आहेत.