Hadapsar : पतीच्या निधनानंतर लग्नाचे आमिष दाखवून दिराचा महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज : पतीचे निधन झाल्यानंतर (Hadapsar) सख्ख्या दिराने लग्न करण्याचे आमिष दाखवून 33 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. नंतर मात्र लग्न करण्यास नकार देऊन पीडित महिलेला आणि तिच्या मुलीला घराबाहेर हाकलून दिले. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. 33 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी या महिलेच्या 32 वर्षीय दीराविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी 2021 मध्ये फिर्यादी महिलेच्या पतीचे निधन झाले होते.. पतीच्या निधनानंतर दिराने फिर्यादीला मी तुझा आणि मुलीचा सांभाळ करतो असे सांगून फिर्यादीला माहेरातून पुण्याच्या हडपसर परिसरात आणले. आणि त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवले. नंतरही वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी सोबत शरीर संबंध ठेवले. त्यानंतर मात्र वाद घालत लग्न करण्यास नकार दिला आणि फिर्यादीला आणि त्यांच्या मुलीला घराबाहेर हाकलून दिले.

पोलिसांनी या प्रकरणी आरोपीत दिराला (Hadapsar) अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Baner News : चौदाव्या मजल्यावरून पडून बावीस वर्षीय कामगाराचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.