Hadapsar : अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला 7 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज- हडपसर भागात पेट्रोलिंग करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडील 7 किलो 935 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई ट्रँगल ब्रिजजवळ शुक्रवारी (दि. 30) करण्यात आली

संदीप भागवत वाघ (रा. उपळाई ठोगे,ता.बार्शी,जि सोलापूर) अभिजीत भगवान थिटे (रा.वैभव टाॅकीजसमोर,गरड बिल्डींग, हडपसर मूळ रा.बार्शी जि. सोलापूर) अशी या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या इसमाची नावे आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर भागात पेट्रोलिंग करीत असताना ट्रँगल ब्रिज,यश बिर्याणीचे समोर दोन व्यक्ती मोटारसायकलवर थांबले असतांना त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांच्याकडे असलेल्या सॅकची तपासणी केली. सॅकमध्ये 7 किलो 935 ग्रॅम गांजा आढळून आला.

त्यांच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करून हिरो कंपनीची मोटारसायकल तसेच रोख रक्कम रुपये 1200/- असा एकूण 2 लाख 2 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमाल आणि पंचनामा यासह पुढील कार्यवाहीसाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.