Hadapsar : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या टेम्पोच्या जोरदार धडकेत एका 45 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) दुपारी दोनच्या सुमारास फुरसुंगी येथील गंगानगर स्मशानभूमीजवळील रस्त्यावर घडली आहे.

राजेंद्र सखाराम पवार (वय 45 रा.फुरसुंगी )असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बालाजी विश्वनाथ बिरादार (वय 28 रा.काळेपडळ,हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी संदेश पवार (वय 43 रा.नसरापुर, भोर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मोठा भाऊ राजेंद्र पवार हे फुरसुंगी येथील गंगानगर स्मशानभूमीजवळील रस्त्यावरुन दुचाकीवर जात होते. बालाजी बिरादार चालवीत असलेल्या टेम्पोची राजेंद्र यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील राजेंद्र पवार हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.