Hadapsar : हडपसर येथे जुन्या कालव्यात पडली कार

एमपीसी न्यूज : हडपसर(Hadapsar), भिमनगर-शिंदेवाडी येथील जुना कालवा या ठिकाणी शुक्रवारी (दि.30) एक कार कालव्यात पडली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून सुदैवाने कोणी जखमी ही झालेले नाही.

एक चारचाकी वाहन पडल्याची वर्दी आज (शनिवारी) सकाळी पावणे दहाच्या सुमारास अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळताच हडपसर अग्निशमन केंद्राकडून तातडीने अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी जवान पोहोचले. वाहनचालक मालक यांच्या मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे चारचाकी वाहन हे शुक्रवारी मध्यरात्री वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते कालव्यात पडले होते.

Vijayadashmi : विजयादशमीच्या दिवशी 70 फुटी रावण दहन; माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या मार्फत कार्यक्रमाचे आयोजन

वाहनामधे वाहनचालक व अजून एक व्यक्ती (Hadapsar) होती. परंतु, कालव्यामधे पाणी अत्यंत कमी असल्याने दोन्ही व्यक्ती बाहेर आल्या होत्या. आज सकाळी दलाचे जवान पोहोचताच स्थानिक नागरिक व पोलिस यांच्यासमवेत क्रेनच्या सहाय्याने वाहन पाण्याबाहेर काढण्यात आले असून वाहनामध्ये कोणीही जखमी किंवा कोणी अडकलेल्या स्थितीमधे असल्याचे आढळले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.