Hadapsar Crime : पुण्यात चार वर्षीय चिमुरडीचा सख्ख्या आईनेच चाकूने भोसकून केला खून

एमपीसी न्यूज : सख्ख्या आईनेच चार वर्षीय चिमुरडीचा चाकूने भोसकून खून (Hadapsar Crime) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरातील हडपसरमध्ये सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. वैष्णवी महेश वाढेल असं खून झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या आईला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्रीच्या सुमारास हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटीत एका चिमुरडीचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून करणाऱ्या कल्पि हिला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. काही महिन्यांपूर्वी ती या ठिकाणी राहण्यासाठी आली होती. बेकरी प्रॉडक्ट विकून ती उदरनिर्वाह करत होती. दरम्यान सोमवारी ती राहते घर खाली करणार होती.

त्यामुळे घरमालक त्या ठिकाणी गेले होते. घरमालकाला त्या ठिकाणी दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. वारंवार आवाज देऊनही तिने दरवाजा न उघडल्याने घरमालक आणि शेजाऱ्यांनी आत जाऊन पाहिले (Hadapsar Crime) असता चिमुरड्या मुलीचा मृतदेह दिसून आला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Pune : पालकमंत्र्यांच्या बैठकीत बिडकरांना पाहताच धंगेकर संतापले; बैठकीवर टाकला बहिष्कार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.