Hadapsar : अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री करणा-या 39 दुकान मालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज-  अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री करणा-या 39 दुकान मालकांवर आज सोमवारी (दि.5) सकाळी 11 ते दूपारी 3 पर्यंत हडपसर परिसरात कारवाई करून माल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिवीतास हानी पोहचविणा-या फटाका विक्री करणा-या दुकांनावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल तांबे यांनी 3 वेगवेगळी पथके तयार केली. व हडपसर येथे 15 अधिकारी व 50 कर्मचारी यांच्यासोबत कारवाई केली. या कारवाईत एकूण 39 ठिकाणी अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री करणा-या दुकान मालकांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तसेच पंचनामे करून फटाक्यांचा माल जप्त करून शिवाजीनगर येथील सरकारी गोडाऊन मध्ये रवाना करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, हमराज कुंभार व हडपसर पोलीस स्टेशनचे 13 अधिकारी व 50 कर्मचा-यांनी मिळून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.