Hadapsar Crime News : टँकरच्या धडकेत खासगी कंपनीची महिला व्यवस्थापिका ठार

एमपीसीन्यूज : भरधाव वेगातील टँकरचालकाने दिलेल्या धडकेत खासगी कंपनीची व्यवस्थापक महिला ठार झाली. हा अपघात दोन दिवसांपुर्वी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हडपरसरमधील सीएनजी पेट्रोलपंपानजीक घडला.

रोहिणी संजय टिळेकर (वय ४८, रा. मांजरी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विजय सायकर (वय २४) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या. दोन दिवसांपुर्वी त्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या टँकरचालकाने त्यांना धडक दिली.

त्यामुळे त्या खाली पडल्या. गंभीररित्या जखमी झाल्यामुळे रोहिणी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.