Hadapsar Crime News : फुरसुंगीत सशस्त्र दरोडा, पिस्तुलाच्या धाकाने सव्वा लाख लुबाडले

एमपीसीन्यूज : फुरसुंगी परिसरातील एका कंपनीत चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकतात पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल एक लाख 27 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.

या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पाच दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आशिष मल्हारी पवार (25, रा. भोई आळी, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे. मुळ रा. लातुर) यांनी फिर्याद दिली आहे.

फुरसुंगीच्या दिघे वस्ती येथील सोनारपूल येथे डेक्सटल लॉजिस्टीक कंपनी आहे. त्या ठिकाणी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पवार आणि त्यांचे सहकारी पार्सल वेगवेगळे करण्याचे काम करत होते.

त्यावेळी अचानक पाच जण तोंडाला रूमाल बांधून तर काही जण माकड टोपी घातलेल्या अवस्थेत कंपनीत शिरले.

त्यांनी लागलीच जवळ असलेल्या पिस्तुलाचा व कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करून कंपनीतील ओमकार यांच्याकडून जबरस्तीने पैसे ठेवलेल्या कपाटाची चावी घेतली. त्यानंतर त्यांनी कपाटातील 1 लाख 27 हजार 337 रूपयांची रोकड चोरी करून ते सर्व जण दुचाकीवरुन पळून गेले.

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.