Hadapsar Crime News : तंबाखू देण्यास नकार देणाऱ्या मित्रावर शस्त्राने वार

एमपीसीन्यूज : तंबाखू मागितल्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसरमधील साहू नगरात हा प्रकार घडला आहे. फक्त तंबाखू मागितल्याच्या कारणावरून राग आल्यामुळे एकाने मित्राला बडवून काढत त्याच्या डोक्यात धारधार हत्याराने मारून जखमी केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मोहन वसंत लोंढे (वय ३०) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अशोक वामन जाधव (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक आणि मोहन एकमेकांच्या ओळखीतले असून हडपसरमधील साहूनगरात राहण्यास आहेत.

दोन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास ते गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अशोकने मोहनला तंबाखू मागितली. मात्र, मोहनने अशोकला तंबाखू देण्यास नकार दिला.

त्याचा राग आल्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे मोहनने अशोकला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर धारधार हत्याराने अशोकच्या डोक्यात मारून जखमी केले.

हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.