Hadapsar Crime News : हडपसरमध्ये राहत्या घरात एकाचा खून, सात दिवसानंतर उघडकीस आला प्रकार

एमपीसीन्यूज : हडपसर परिसरातील एका फ्लॅटमध्ये तरूणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. आठवड्यानंतर खुनाला वाचा फुटली आहे. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

ग्रेगरी जॉन कार्डोस (वय ४२) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी शहनाज कार्डोस यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रेगरी हे इलेक्ट्रिकची कामे करत होते. त्यांचे आणि पत्नी शहनाजचे वाद होते. त्यामुळे पत्नी त्यांच्याजवळ राहत नव्हती. लॉकडाऊनमुळे ग्रेगरी घरीच राहत होते.

आज पहाटेच्या वेळी त्यांच्या घरातून वास येत असल्याने नागरिकांनी डोकावून पाहिले. त्यानंतर ग्रेगरीचा मृतदेह नागरिकांना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पाहणीत अज्ञाताने त्यांचा खून केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ग्रेगरी यांना दारूचे व्यसन होते. त्यांना आजार देखील होता. पोस्टमोर्टमनंतर त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.