Hadapsar Crime News : हडपसर परिसरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला एकाचा मृतदेह

एमपीसीन्यूज : हडपसर परिसरातील कापरे मळ्यात एका नागरिकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.

दत्ता साहेबराव कांबळे असे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला आहे. हडपसर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हडपसर परिसरातील कापरे मळ्यात हा मृतदेह सापडला. या परिसरात शक्यतो कुणी फिरताना आढळत नाही. दारूडे आणि फिरस्ते या परिसरात असतात.

दरम्यान, आज सकाळच्या सुमारास याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डोक्यात दगड घालून खूप केली असण्याची शक्यता सध्या तरी पोलिसांनी व्यक्त केली.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.