Hadapsar Crime News : बिअर उधार देण्यास नकार दिल्याने टोळक्याकडून दुकानाची तोडफोड

एमपीसीन्यूज ; बिअर उधार न दिल्याच्या रागातून एका टोळक्याने बिअर शॉपी सह पाच दुकानांची तोडफोड करत चार हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. हडपसरमधील काळेपडळ परिसरात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली.

वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. तर त्याचे चार साथीदार फरार आहेत. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी प्रतीक उर्फ नन्या याने साथीदारांसह एस. के. बिअर शॉपीवर गेला होता. त्याने बिअर शॉपीतील कामागाराला उधारीवर बिअर मागितली. मात्र, मॅनेजरने त्यांना बिअरची बाटली देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे त्याने इतर साथीदारांच्या मदतीने शॉपीच्या काउंटरची तोडफोड केली.

त्यावेळी तेथे उभा असलेले श्री मेडीकलचे सुरज सुतार यांना टोळक्याने दम दिला. तू इथे उभा राहून काय तमाशा बघतोय, असे म्हणत मेडीकलचे काउंटर फोडून गल्ल्यातील ३ हजार ८०० रूपयांची रोकड चोरून नेली.

त्याशिवाय परिसरातील सलून दुकानासह किराणा दुकान आणि चिकनच्या दुकानांची तोडफोड करून नुकसान केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.