Hadapsar Crime News : पाव विकताना रेकी करून दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, 10 दुचाकी जप्त

0

एमपीसीन्यूज : हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी रेकी करून दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

फैज आरिफ अन्सारी उर्फ बेनटेन (वय 22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना पोलीस शिपाई अकबर शेख आणि प्रशांत दुधाळ यांना पोलीस स्टेशन परिसरात दुचाकीवर करणारे तीन चोरटे मांजरी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला होता.

_MPC_DIR_MPU_II

याच दरम्यान पोलिसांनी सोलापूर रोडने मांजरीकडे एका दुचाकीवरून तिघेजण येत असताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यातील दोघे अल्पवयीन होते.

त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्र विषयी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून सखोल चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली.

आरोपी फैज उर्फ बेनटेन हा हडपसर परिसरातच पाव विक्रीचा व्यवसाय करतो. हा व्यवसाय करत असताना तो परिसरातील वाहनांची रेकी करत असे व त्यानंतर वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने त्याची चोरी करत असे. आतापर्यंत त्यांनी केलेले दहा गुन्हे उघडकीस आली असून त्यातील दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment