Hadapsar : साधना कन्या विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद

एमपीसी न्यूज- रयत शिक्षण संस्थेच्या चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयात विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यात्तमांत विद्यार्थिनींनी आपले कलागुण सादर केले.

कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, नगरसेविका सुलोचनाताई तुपे , सामाजिक कार्यकर्त्या वंदना मोडक, प्राचार्या सुजाता कालेकर, आदिनाथ पिसे, मंदाकिनी साबळे, रतिभा कुंभार, छाया पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शिक्षणाबरोबर विद्यार्थिनींना विरंगुळा म्हणून शाळा विविध उपक्रम राबवत असते त्यापैकी सांस्कृतिक कार्यक्रम महत्वाचा असल्याचे प्राचार्या सुजाता कालेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या लावणीनृत्य ,कोळीनृत्य, देशभक्तीपर गीते, भरतनाट्यम, सोलोडान्स, बॉलिवूड डान्स सह भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडविणाऱ्या नृत्यप्रकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयातील विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख सारिका जाधव, ममता कुमठे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन शिवाजी मोरमारे, स्वप्ना शिंदे यांनी केले. विद्यार्थीनी, पालक व प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने उपमुख्याध्यापक आदिनाथ पिसे यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.