Hadapsar : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन केली आत्महत्या

एमपीसी न्यूज-पुण्यातील हडपसर (Hadapsar ) भागात राहणार्‍या 41 वर्षीय जावायास पत्नी,सासू,सासरे, मेव्हणा आणि अन्य एक या चौघांकडून मानसिक त्रास दिला जात होता.या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अभय गवळी वय 41 असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे.पत्नी , सासू ,सासरे जालिंदर आंबवडे, मेव्हणा संतोष आंबवडे आणि अन्य एक या पाच जणांविरोधात हडपसर पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirgaon : हातभट्टी दारू तयार करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अभय गवळी यांचा विवाह जानेवारी 2014 मध्ये झाला होता. ते दोघे पती पत्नी शेवाळेवाडी येथील भडलकरनगर येथे राहण्यास होते.अभय आणि पत्नी  या दोघांचा विवाह झाल्यापासून सासू , सासरे जालिंदर आंबवडे, मेव्हणा संतोष आंबवडे हे अभय यांच्या संसारात ढवळाढवळ करीत होते.तसेच पत्नी या आई,वडीलांचे ऐकत होत्या.यावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले.या सर्व सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अभय गवळी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अभय गवळी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.त्यामध्ये पत्नीसह सासरकडील चार जण मंडळी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.त्यानुसार पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला (Hadapsar ) आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.