Hadapsar Fire News: हडपसर येथे भीषण आगीत प्रिंटींग प्रेस जळून खाक

एमपीसी न्यूज – पुण्यातील हडपसर परिसरात एका प्रिंटींग प्रेसला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे संपूर्ण हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मागील एक तासापासून सुरू असलेल्या या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाचा पाच गाड्या आणि पाण्याच्या टँकरद्वारे तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

हडपसर गावातील राम मंदिर जवळ ही प्रिंटींग प्रेस आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास या प्रेसमध्ये आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण प्रेसमध्ये भीषण आग लागली. या संपूर्ण कागदी पुठ्ठे असल्यामुळे काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले होते.

दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांना आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. या गाड्या घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच चारही बाजूने आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीचे लोळ आणि त्यातून निघणारा धूर दूरवरून ही दिसत होते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.