Hadapsar : हडपसरवासीयांना विकासाचा दिलेला शब्द पूर्ण करणार-वसंत मोरे

बंटर हायस्कूल येथे शुक्रवारी राज ठाकरे यांची जाहीर सभा

एमपीसी न्यूज – हडपसर मतदारसंघातील नागरिकांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करणारच असल्याचा विश्वास मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी व्यक्त केला. हडपसर, कात्रज, कोंढवा, मुंढवा, साडेसतरानळी, महमदवाडी, मांजरी, महादेवनगर असा संपूर्ण मतदारसंघ मोरे यांनी पायी फिरून पिंजून काढला.

वसंत मोरे यांचे महिलांनी घरोघरी आरती करून औक्षण केले. बंटर हायस्कूल हडपसर येथे उद्या सायंकाळी सहा वाजता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. नागरिकांनी या सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वसंत मोरे यांनी केले आहे.

‘ऐ लाव रे तो व्हिडीओ’ लागणार भाग दोन, विद्यमानांची होणार पोलखोल, मग येताय ना व्हिडीओ पहायला ? असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हडपसर विधानसभा मतदारसंघातर्फे करण्यात आले आहे. अवघ्या महाराष्ट्राला हेवा वाटेल, असा हडपसर मतदारसंघ घडवायला साथ द्या. आणि रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून विकासाला मत द्या, असे आवाहन वसंत मोरे यांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले, ” विद्यमान आमदारांच्या विरोधात नागरिकांचा प्रचंड राग आहे. हडपसरचे अनेक प्रश्न आपण पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण उपस्थित केले. या भागात संपूर्ण शहराचा कचरा आणून टाकला जातो. हा कचरा शहराच्या चारही बाजूंनी जिरविला जावा, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. वाहतूक आणि पिण्याचा पाण्याचा सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे”

भाजीमंडई, 13 गार्डन, सर्वात उंच झेंडा, गोरगरीब नागरिकांना घरे बांधण्यासाठी मदत, मोफत नळ कनेक्शन, अशी अनेक विकासकामे वसंत मोरे यांनी केल्याचे कात्रज भागातील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ते 1 लाख मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही परिस्थितीत मोरे यांना आमदार करण्याचा निर्धार हडपसर मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे. कोंढवा, मिठानगर भागांतून मनसेला चांगली मते मिळवून देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे नगरसेवक साईनाथ बाबर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.