HB_TOPHP_A_

Hadapsar- ‘स्वप्नलि, मी तुला राहू देणार नाहीच !’ च्या पत्रकांनी हडपसर परिसरात खळबळ

4,576

एमपीसी न्यूज – हडपसर परिसरात सर्वत्र लागलेल्या पत्रकांमूळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जागोजागी लावण्यात आलेली ही पत्रके पोलिसांनी काढली असून पत्रके लावणा-या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

HB_POST_INPOST_R_A

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात जागोजागी लावलेल्या फ्लेक्समुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली होती. या चर्चांना हडपसर येथील घटनेने पुन्हा उधान आले आहे. या पत्रकात एका आकाश नावाच्या तरूणाने त्याच्या आणि स्वप्नलिच्या नात्याविषयी लिहीले असून प्रेमभंगातुन हे कृत्य करण्यात आले असल्याचे पत्राच्या मजकूरातून समोर येत आहे.

काय लिहिले आहे नेमके या पत्रकात ?

मी आकाश,
“स्वप्नलि आणि मी कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही रिलेशनशिप मध्ये आहे. आणि गेल्या वर्षांमध्ये आम्ही लग्न पण केल. घरच्याना न सांगता, आणि एकत्र राहत पण होतो. पण ती काही महिन्यापूर्वी मला सोडून गेली. कारण तिचं-माझं तिच्या आईमुळे पटत नव्हते. तिला माझ्या घरच्या सोबत रहायचे नव्हते. तिला पैसा खुप महत्वाचा आहे . आणि आज ती कोण कुठला शैलेश भुजबळ , त्यांच्या सोबत लग्न करायला तयार झाली. स्वप्नलि एवढी नीच बाई आहे ती एवढ्या वर्षाचं रिलेशनशीप नवरा बायकोच नातं तोडून कोण तो कुठला शैलेश भुजबळ त्यांच्या सोबत लग्न करती. लग्न करून जी मला सोडून गेली ती काय कोणाची राहणार ? कुठेही जा तू स्वप्नलि मी तुला राहून देणार नाहीचं.”

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: