Hadapsar – पूर्ववैमनस्यातून दारूच्या बाटलीने गळा चिरून तरुणाचा खून; एकाला अटक

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाचा विषय पुन्हा काढून दारू पिण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणाचा दारूच्या बाटलीने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी(दि.19) रात्री पावणे दोन च्या सुमारास फुरसुंगी येथे घडली.
मंजुर रेहमान शेख ऊर्फ राजा शेख(वय 24, रा.फुरसुंगी) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी फिर्याद दिली आहे.आकाश बाळासाहेब हरपळे (वय 19, रा. खंडोबाचा माळ, फुरसुंगी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी आकाश हा मंजुरला घेऊन ऊस तोडलेल्या खोडव्याच्या सरीवर दारू पिण्यासाठी गेला होता. दरम्यान आकाशने मंजुरशी पूर्वी झालेल्या भांडणाचा पुन्हा विषय काढून वाद घातला.व रागामध्ये दारूची बाटली फोडून मंजुरच्या शरीरावर बाटलीने वार केले व त्याचबरोबर त्या बाटलीने मंजुरचा गळा चिरून अमानुष पणे त्याचा खून केला.
याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.