Hadapsar News: शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत साधना कन्या विद्यालयाच्या 63 विद्यार्थिनी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालयातील एकूण 63 विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये इयत्ता पाचवीच्या आदिती जाधव हिने राज्य गुणवत्ता यादीत 13 वा क्रमांक तर इयत्ता आठवीची श्वेतांबरी झुरुंगे हिने राज्य गुणवत्ता यादीत 17  वा क्रमांक मिळवला आहे.

त्याचबरोबर पाचवीच्या 28 आणि इयत्ता आठवीच्या 35  विद्यार्थिनींनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देदीप्यमान यशाची परंपरा कायम राखल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर यांनी दिली. गुणवत्ता धारक विद्यार्थीनी पुढीलप्रमाणे

इयत्ता पाचवी – आदिती जाधव (262, राज्यात 13 वी), धनश्री लोखंडे (256), संतोषी जंजिरे (254), प्रणिता सावंत (252), तेजस्विनी भोसले (250), जान्हवी काळे (244),कृतिका सराटे (244),वैष्णवी शेवते (242),वेदिका गोबरे (240),मधुरा मालुसरे (240),सृष्टी पाटील (230),नमिता मांडवे (228),वैष्णवी पवार (228),हर्षदा करचे (226),प्रगती कुंभार (226),आर्या जाधव (224),आदिती बिभीषण जाधव (222),वर्षा मोहोळकर (222),शरयु महामुनी (220),स्नेहा साळे (220),पियुशा भराटे (214),प्रतीक्षा वाबळे (212),नंदिनी देशमुख (212),श्रुती भोसले (212),अनुष्का पवार (210),गौरी गायकवाड (210),आदिती नंदुर्गे (210),भक्ती पोतदार (210)

इयत्ता 8 वी – श्वेता झुरंगे 262 (राज्यात 17 वी),स्नेहल रोंगटे (260),आदिती बडवे (256), पूर्वा मुळे (252), शर्वरी पवार (248), शुभांगी डोके (244), सोनिया पानगट्टे (242), काजल रणनवरे (240), मेघा शेंडे (238), भक्ती साळुंखे (236), प्रांजली राऊत (232), प्रिया घायतिडक (232), दीक्षा फरतडे (230), जागृती चौधरी (230), श्रावणी पांढरे (224), मानसी देवदुर्ग (224), गायत्री डोंबाळी (222), प्रतीक्षा पाटील (220), ईश्वरी नलावडे (220), नंदिनी ढोले (220), सानिका दिवेकर (216), श्रावणी उमाणे (216), गौरी ननावरे (216), अक्षदा पवार (214), सोनल शिंदे (214), सानिका मोडक (214), श्रावणी न्हावले (212), श्रेया बचुटे (212), संस्कृती बदक (210), श्रावणी खवले (210), गौरी तांबे (210), सिद्धी रणनवरे (208), नियती चौधरी (208), अक्षता आरडे (208), वैष्णवी खाडे (206).

रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे, (स्थानिक शाळा समिती सदस्य ), मॅनेजिंग काऊन्सिल सदस्य दिलीप तुपे, विभागीय अधिकारी किसनराव रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.