रविवार, जानेवारी 29, 2023

Hadapsar News : मालकाच्या घरात दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला बेड्या

एमपीसी न्यूज : कुटुंबीय वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी (Hadapsar News) बाहेर गेल्याचे निमित्त साधून घरात काम करणाऱ्या मोलकरणीने सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. मात्र, हडपसर पोलिसांनी अतिशय शिताफिने तपास करत या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली आहे. दागिने चोरणाऱ्या या मोलकरणीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर येथील तक्रारदार कुटुंबाने पुजेसाठी दागिने कपाटात ठेवले होते. तर, मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते २७ नोव्हेंबर रोजी दापोलीत गेले होते. तेथून परत आल्यानतंर त्यांनी दागिने पाहिले असता ते मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात केली होती. घरफोडीत कुलूप न तोडता व कपाटाचे देखील नुकसान न करता चोरी झाली होती. त्यामुळे पोलिसांना जवळच्याच व्यक्तीवर संशत होता. तर, ही मोलकरीन महिला देखील संशयाच्या घेऱ्यात होती. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. पण, तिने गुन्हा केला नसल्याचे सांगितले. तर, परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यातही तिच्यावर संशयास्पद आढळून आले नाही.

मात्र, पुन्हा पोलिसांनी तिच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने तपास (Hadapsar News) सुरू केल्यानंतर तिच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली असता तिथे काहीच हाती लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी रिक्षा चालक असणाऱ्या पतीकडे चौकशी करून त्याच्या रिक्षाची झडती घेतली. त्यावेळी या रिक्षातील पाठीमागच्या सीटमध्ये दागिने मिळाले. त्यानंतर तिला पोलिसी खाक्या दाखविताच तिने गुन्ह्याची कबूली दिली व रिक्षात दागिने आपणच ठेवल्याचे सांगितले. तर, उर्वरित दागिने तिने टेरेसवरील कचऱ्यात ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तिच्याकडून चोरीस गेलेले ७ तोळ्याचे दागिने जप्त केले आहेत.

Pune Crime : ‘संबंध ठेवले नाही तर ऍसिड फेकेन’, महाविद्यालयीन तरुणीला धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

Latest news
Related news