Hadapsar: वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; एकाला अटक

एमपीसी न्यूज – वाहतूक पोलीस कर्मचा-यास धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि.14) रात्री पावणेआठच्या सुमारास हडपसर येथील ससाणेनगर रेल्वेगेटजवळ घडली.

गणेश विठ्ठल पवार (वय 35, रा.ससाणेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी डी.डी. गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे ससाणेनगर रेल्वेगेटजवळ वाहतूक नियमनाचे काम करत होते. त्यावेळी गणेश पवार याने गायकवाड यांना त्यांचे काम करण्यास प्रतिबंध करून अपशब्द वापरले. एवढेच नाही तर त्याने गायकवाड यांना धक्काबुक्की केली.

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गणेश पवार याला अटक करण्यात आली असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.