HB_TOPHP_A_

Hadapsar -पीएमटी वाहकाला किरकोळ कारणावरून मारहाण ; एकाला अटक

220
एमपीसी न्यूज – पाय-यावरून गाडीत येऊन बसण्यास सांगितल्याच्या कारणावरून पीएमटी वाहकाला अपशब्ध वापरून मारहाण केल्याची घटना काल बुधवारी(दि.5) सकाळी साडेनऊ च्या सुमारास हडपसर येथील बॅंटर स्कुल समोप पीएमटी बसमध्ये घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
सुधिर विठ्ठल डाके(वय 42, रा.हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी बापु वणवे(वय 43, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  यातील आरोपी सुधीर हा बसच्या पाय-यावर बसल्यामुळे वाहकाने त्यास गाडीमध्ये बसण्यास सांगितले. त्यामुळे सुधिरला त्या गोष्टीचा राग आला आणि त्याने वाहकाला अपशब्द वापरत त्यांच्याशी हुज्जत घातली. एवढेच नाहि तर त्याने वाहकाच्या तोंडावर जोरात मारून त्यांना गंभीररित्या जखमी केले. वाहकावर ससुन रूग्णालयात उपचार करण्यात आले असून याप्रकरणी आरोपी सुधीर याला अटत करण्यात आली आहे.
याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.
HB_POST_INPOST_R_A
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: