Hadapsar Police : चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन आरोपींना केली दीड तासात अटक

एमपीसी न्यूज : हडपसर पोलिसांनी अवघ्या दीड तासात हडपसर (Hadapsar Police) येथील नागरिकांना चाकूचा धाक दाखवून, वार करून लुटणाऱ्या दोन आरोपींना अटक केली.  

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी हडपसर पोलिसांना व्हॉटसअप ग्रुपवर 5 मे रोजी रात्री 9.27 वाजेच्या सुमारास आकाशवाणी हडपसर पुणे गेट क्रमांक 2 येथे डंपर जवळ काही तरुण लोकांना लुबाडत असल्याची माहिती मिळाली. मार्शल सागर दळवी, शशिकांत नाळे आणि सुरज कुंभार यांच्या पथकाने तात्काळ तेथे धाव घेतली.

परंतु, आरोपी पळण्यात यशस्वी झाले. काही वेळातच दोन ते तीन तक्रारदारांनी दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून मोबाइल आणि पैसे चोरल्याची तक्रार केली. हे आरोपी काळ्या डिओ गाडीतून आले असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. एका फिर्यादीच्या छातीत तर दुसऱ्याच्या खांद्यावर चाकूने वार करण्यात आला होता.

Talegaon Dabhade Fraud : बनावट दागिने तारण ठेऊन मुथ्थुट फायनान्सची दोन लाखांची फसवणूक

फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, मार्शल सागर दळवी, शशिकांत नाळे आणि सुरज कुंभार यांच्या (Hadapsar Police) पथकाने लगेचच तपास सुरू केला. 6 मे रोजी या दरम्यान पांढरमेळा कॅनल रोडने आरोपींचा तपास करत असताना, पोलिस नाईक शशिकांत नाळे यांना दोन इसम फिर्यादींनी वर्णन केलेल्या काळ्या डिओवरून रिक्षा चालकास चाकूचा धाक दाखवून वार करून लुटत असल्याचे दिसले. त्यांनी शिताफीने एका आरोपीस अटक केले. तर, दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

एकास अटक –

अटक केलेल्या आरोपीचे नाव ओंकार विनोद मासाळ उर्फ हर्षद सलीम शेख असून, तो 22 वर्षांचा (रा. 217, घरवस्ती, जुना बाजार मंगळवार पेठ, पुणे) आहे. पोलिसांनी डिओ गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये 9 मोबाइल हँडसेट सापडले. तर, पळून गेलेला आशीष उर्फ गुड्डू (रा. नवीन म्हाडा, रामटेकडी, पुणे) सोबत त्याने 5 मे रोजी कोंढवा येथून संध्याकाळी 7 वाजता चोरी करण्यास सुरूवात करून तेथून चंदननगर, हडपसर परिसरात चाकूचा धाक दाखवून तसेच त्यांच्यावर चाकूने वार करून जबरदस्तीने लोकांकडून मोबाइल चैन, पाकीट, चोरी केल्याचे कबूल केले.

Rahatani News: दिवसाढवळ्या ऑफीसचे कुलूप तोडून दीड लाखाचे साहित्य चोरीला

या दोन्ही आरोपींना हडपसर पोलिसांनी अवघ्या दीड तासात अटक केली असून, त्यांच्यावर भादविक. 394, 34 या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय कुमार शिंदे करत आहेत.

16 गुन्ह्यांची कबुली – 

सदर तपासात ओंकार विनोद मासाळ उर्फ हर्षद सलीम शेख यांच्या आणखी 16 गुन्ह्यांचा पर्दाफाश हडपसर (Hadapsar Police) पोलिसांनी केला असून, हे गुन्हे वानवडी, हडपसर, लोणीकंद, मुंढवा, खडक, फरासखाना, मार्केटयार्ड पोलिस स्टेशन व जामखेड अहमदनगर पोलिस स्टेशन हद्दीतील आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.