Hadapsar Rape Case : कंपनीच्या कामानिमित्त सुरतला घेऊन गेला अन् सहकारी महिलेवर बलात्कार केला

एमपीसी न्यूज : कंपनीच्या (Hadapsar Rape Case) कामानिमित्त सहकारी महिलेला सुरत येथे घेऊन गेल्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर या महिलेच्या पतीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून त्यांची बदनामी केली. 34 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली असून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयंक हरीशभाई जोगी (वय 38) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मार्च 2021 पासून वेळोवेळी हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर परिसरातील मगरपट्ट्यात असलेल्या एका नामांकित कंपनीत आरोपी आणि फिर्यादी काम करत होते. आरोपीने फिर्यादीला (Hadapsar Rape Case) कंपनीच्या कामानिमित्त सुरत या ठिकाणी नेले होते. त्या ठिकाणी आरोपीने फिर्यादीला नोकरीस लावले आहे या कारणाने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्यांना नोकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडून पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीच्या मोबाईल क्रमांकावर वेगवेगळे अश्लील मेसेज पाठवून त्यांची बदनामी केली.

संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

PMC : पुणे विमानतळ ते विमान नगर हा पर्यायी रस्ता होणार; संरक्षण मंत्रालयाची परवानगी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.