Hadapsar : नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्याने खळबळ

एमपीसी न्यूज- हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्याने हॉस्पिटल परिसरामध्ये खळबळ उडाली. या मेलमधून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नोबेल हॉस्पिटलकडे धाव घेतली. पोलिसांच्या बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून हॉस्पिटलची संपूर्ण तपासणी करण्यात आली. मात्र बॉम्ब किंवा स्फोटके आढळून आली नाहीत. हॉस्पिटल परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.