Hadapsar : धक्कादायक! काकानेच अल्पवयीन पुतणीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले

Shocking! The uncle forced his minor niece into prostitution आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या अल्पवयीन चुलत पुतणीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या काका-काकूला हडपसर पोलिसांनी अटक केली.

एमपीसी न्यूज – पुण्याचा हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या अल्पवयीन चुलत पुतणीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या काका-काकूला हडपसर पोलिसांनी अटक केली. वेश्याव्यवसाय करण्यासाठी त्यांनी या मुलीचे बुलढाणा येथून अपहरण करून पुण्यात आणले होते. इथे आल्यानंतर तिच्याकडून त्यांनी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. दिलीप सखाराम पवार आणि अरुणा दिलीप पवार अशी आरोपी काकूंची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की बुलढाणा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पुण्यात आणले असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती. तिचा शोध घेण्याचे मोठे आव्हान हडपसर पोलिसांसमोर होते. दरम्यान शोध सुरू असतानाच पीडित मुलगी वरील दोन आरोपींसोबत मांजरी बुद्रुक गावात थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन या तिघांनाही ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यांनी पैसे देण्याच्या आमिषाने या मुलीला बुलढाणा येथून पुण्यात आणले होते. तसेच तिची इच्छा नसतानाही पैसे कमावण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपासासाठी बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात सोपवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.