Hadapsar : अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास दिल्लीतून अटक

एमपीसी न्यूज : हडपसर येथील अल्पवयीन मुलीस ऑगस्ट महिन्यात पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अत्यंत कौशल्याने 7 डिसेंबर ला रात्री 10 च्या सुमारास दिल्लीतील सुल्तानपूर येथुन अटक करून मुलीची सुखरूप सुटका केली आहे.

गणेश बालनाथ मोरे (वय 23, रा. मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचा गुन्हा हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल होता.या गुन्ह्याच्या तपासादरम्यान बतमीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी दिल्लीतील सुल्तानपूर येथे सलग 2 दिवस सापळा रचून अखेर 7 डिसेंबर रात्री 10 च्या दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीला आणि मुलीला ताब्यात घेतले.

या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीचा शोध घेणे अत्यंत कठीण होते कारण मुलीला पळवून नेल्यानंतर आरोपीने कोणत्याही मोबाईलचा, बँक किंवा इतर साधनांचा वापर करणे टाळले होते. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लावणे हे मोठे आवाहन होते. तरीदेखील पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले आणि मुलीची सुखरूप सुटका केली. यातील आरोपीस न्यायालयाने 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.