Chakan : चाकण परिसरात गारांचा पाऊस

एमपीसी न्यूज : चाकण शहरासह (Chakan) लगतच्या भागाला बुधवारी (दि. 31) मुसळधार पावसाने झोडपले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सोसाट्याचा वारा व  विजांच्या कडकडाटात गारांचा पाऊस झाला. शहरातील अनेक भागात गारांचा खच पडला होता. मागील अनेक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गारांचा प्रथमच पाऊस झाल्याचे चाकण परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.

सकाळपासूनच उन्हाची तगमग आणि वाढत्या तापमानामुळे नकोसे केले असताना सायंकाळी आकाशात काळे ढग जमा होऊन जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात गारांचा पाऊस झाला. वातावरणातील बदलाने गारपीट, वादळी वारे उन्हाळी बाजरी, पालेभाज्या, फळभाज्या, फळे आदी पिकांना फटका देत आहेत.

Pune : अल्पवयीन मुलीचा पाठलाग, पळवून नेण्याची धमकी; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

उभी पिके कोलमडत असून गारांच्या पावसाने धोपटली जात आहेत. हवामान (Chakan) बदलाने मोठे नुकसान होत आहे.  वातावरणातील ही बदल प्रक्रिया व त्याचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे मेटाकुटीस आले आहेत.

दरम्यान सोमवारी सायंकाळी पाऊन तास झालेल्या पावसाने चाकण शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.  शहरातील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडीत झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.