Hajj pilgrimage : कोरोनामुळे भारतीय मुसलमान यावर्षी हज यात्रेसाठी जाणार नाहीत – मुख्तार अब्बास नक्वी

Corona prevents Indian Muslims from going on Hajj this year: Mukhtar Abbas Naqvi

कोणतेही शुल्क न कापता अर्जदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे भारतीय मुसलमान यावर्षी हज यात्रेसाठी जाणार नाहीत. हज यात्रेला जाण्यासाठी 2 हजार 300 हून अधिक महिलांनी मेहरम शिवाय (पुरुष जोडीदाराशिवाय) अर्ज केला होता; या महिलांना आता हज 2021 यात्रेसाठी पाठवले जाणार आहे. हज 2020 अर्जाच्या आधारेच पुढील वर्षी हज यात्रेसाठी पाठविले जाणार आहे. तसेच पुढील वर्षी मेहरमशिवाय हज यात्रेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व महिलांनाही हज यात्रेला पाठवले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. ते आज (बुधवारी) नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, “कोरोना साथीच्या आजारामुळे उद्‌भवलेल्या गंभीर आव्हानांमुळे, सौदी अरेबियन सरकारच्या निर्णयाचा आदर करत आणि लोकांचे आरोग्य आणि हित लक्षात घेत भारतातील मुसलमानांना यावर्षी हज (1441 एच/2020 एडी) साठी सौदी अरेबियाला न पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नक्वी म्हणाले की, सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री महामहीम डॉ. मोहम्मद सालेह बिन ताहेर बेन्तेन यांचा दूरध्वनी आला होता, त्यांनी कोरोना साथीच्या आजारामुळे यावर्षी (1441 एच/2020 एडी) साठी भारतातून हज यात्रेकरूंना हजसाठी न पाठविण्याची सूचना केली आहे.

ते म्हणाले की, याविषयावर त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि आपली सहमती दर्शविली, संपूर्ण जग कोरोना साथीच्या आजारामुळे उद्‌भवलेल्या आव्हानांचा सामना करत आहे आणि सौदी अरेबियावर देखील या साथीच्या आजाराचा परिणाम झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

नक्वी पुढे म्हणाले की, हज 2020 साठी 2 लाख 13 हजार अर्ज आले होते. कोणतेही शुल्क न कापता अर्जदारांनी जमा केलेली रक्कम तातडीने परत करण्याची प्रक्रिया सुरु केली असून ऑनलाईन डीबीटी पद्धतीने अर्जदारांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील.

2 हजार 300 हून अधिक महिलांनी मेहरम शिवाय हज यात्रेला जाण्यसाठी अर्ज केला होता. या महिलांना आता हज 2021 यात्रेसाठी हज 2020 च्या अर्जाच्या आधारेच हज यात्रेसाठी पाठविले जाईल. त्याशिवाय, पुढच्या वर्षी मेहरमशिवाय हज यात्रेसाठी नवीन अर्ज करणार्‍या सर्व महिलांनाही हज यात्रेसाठी पाठवले जाईल.

2019 मध्ये एकूण 2 लाख भारतीय मुसलमानांनी हज यात्रा केली होती. या यात्रेकरुंमध्ये 50 टक्के महिला होत्या. 2018 मध्ये मुस्लिम महिला मेहरम शिवाय (पुरुष जोडीदाराशिवाय) हज यात्रा करू शकतात हे सरकारने सुनिश्चित केल्या पासून आतापर्यंत एकूण 3 हजार 40 महिलांनी हज यात्रा केली आहे.

मंगळवारी रात्री उशिरा सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे, ज्यात म्हटले आहे की “कोरोना साथीच्या आजारामुळे आणि गर्दीच्या ठिकाणी आणि मोठ्या संख्येने लोकं जमा होणाऱ्या ठिकाणी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या धोक्यामुळे या वर्षासाठी हज (1441 एच / 2020 एडी) सौदी अरेबियामध्ये आधीपासूनच राहत असलेल्या विविध देशांमधील लोकांद्वारेच अत्यंत मर्यादित संख्येने हज यात्रा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व प्रतिबंधक उपाय आणि शारीरिक अंतराच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून हज सुरक्षित पद्धतीने पार पाडला जावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.