Kondhwa : पालिकेच्या महिला सफाई कामगारांसाठी कोंढवा येथे हळदी – कुंकू समारंभ

एमपीसी न्यूज : इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपतर्फे पालिकेच्या (Kondhwa) महिला सफाई कामगारांसाठी कोंढवा येथे आयोजित हळदी- कुंकू समारंभाला बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला.

दि. 2 फेब्रुवारी रोजी इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप तर्फे कोंढवा भागातील पालिकेच्या घनकचरा विभागासाठी रस्त्यांची सफाई, झाडलोट करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.

मिठानगर भागात प्रथमच हा अनोखा हळदी कुंकू समारंभ पार पडला. भारतीय संविधानानुसार एकता आणि बंधुता याचे प्रतीक डोळ्यासमोर ठेवून हिंदू – मुस्लिम भाईचारा तसेच धर्माचे आदर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदरचा कार्यक्रम राबविला.

Pimpri News : माहिती अधिकारातील अर्जाला ‘केराची टोपली’ दाखविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

या कार्यक्रमात मिठानगर कोठी, कौसर बाग तसेच लुल्ला नगर कोठीच्या महिला कामगारांनी यात सहभाग घेतला. तसेच स्थानिक महिलांनी देखील या कार्यक्रमात उत्फुर्त सहभाग नोंदविला. उपस्थित (Kondhwa) महिलांसाठी चहापान समारंभ झाला, तसेच मेंदीचे कोन भेट देण्यात आले.

इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृपचे पदाधिकारी सचिन अल्हाट यांनी राईट टू एज्युकेशन कायद्याची माहिती दिली तर इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृपचे संस्थापक अध्यक्ष -असलम इसाक बागवान यांनी महिला सबलीकरण तसेच महिला अधिकार याची माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.