Hinjawadi : हिंजवडी, सांगवी परिसरातून साडेसहा लाखांची वाहने आणि लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – हिंजवडीमधून एक कार आणि एक लॅपटॉप चोरीला गेला आहे. तर सांगवी परिसरातून एक मोटार सायकल चोरीला गेली आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 6) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महेशकुमार दत्ताजी गायकवाड (वय 29, रा. कोथरूड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांची 4 लाख रुपये किंमतीची एम एच 24 / ए डब्ल्यू  0450 ही कार गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास एल एम डी चौक बावधन येथे पार्क केली होती. दिवसभरात अज्ञात चोरट्यांनी ती कार चोरून नेली. हा प्रकार रात्री आठच्या सुमारास उघडकीस आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोमस बावच्छान वर्गीस (वय 54, रा. बावधन) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची एम एच 12 /आर वाय 7770 ही कार बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास बावधन येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर उभी केली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून कार मधून एक लाख रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

स्टीफन ॲलेक्स अल्हाट (वय 20, रा. शिवम राज पार्क, इंद्रप्रस्थ चौक, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची दीड लाख रुपये किंमतीची एम एच 14 / जी एक्स 8516 ही दुचाकी एक फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आला. याबाबत गुरुवारी (दि. 6) फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like