Pune : इन्शुरन्स पॉलिसीवर कोटींचा फायदा झाल्याचे सांगत ज्येष्ठाला दीड कोटींला फसवले

एमपीसी न्यूज – इन्शुरन्स पॉलिसीवर कोटींचा फायदा झाल्याचे सांगत ज्येष्ठाची दीड कोटींची ऑनलाईन माध्यमाद्वारे फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर येथे राहणाऱ्या 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथे राहणाऱ्या एका 84 वर्षीय वृद्धाला काही अज्ञात मोबाईलधारकांनी वारंवार फोन केले. त्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आणि तुम्हाला जुन्या इन्शुरन्स पॉलिसीवर व्याज, लाभ आणि बोनस अशी तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे असे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी फिर्यादी यांना मार्च 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत वेळोवेळी फोन करून तब्बल 1 कोटी 51 लाख 92 हजार 400 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.