_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon : खताच्या पोत्यात बांधून टाकला पुरुषाचा अर्धा मृतदेह

एमपीसी न्यूज – ओढ्याच्या कडेला खताच्या पोत्यात घालून एका व्यक्तीचा कमरेपासून पायाचा भाग सापडला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास शिरगाव-कासारसाई रोडवर साळुंब्रे-दारुंब्रे गावाजवळील ओढ्यात उघडकीस आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

शिरगाव चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास साळुंब्रे-दारुंब्रे गावाजवळील ओढ्यात पांढ-या खताच्या पोत्यात एक पुरुष जातीचा 35 ते 40 वयाचा अर्धवट कमरेपासून पायाचा भाग सापडला. दोन्ही पाय कॉटनच्या हिरव्या रंगाच्या साडीने बांधलेले आहेत. खून करून शरीराचा अर्धा भाग वाहनातून आणून टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस चौकीत अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास, कमरेपासून वरचा भाग आढळून आल्यास शिरगाव पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे (8208786499) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.