Pimple Gurav : आठ अनधिकृत बांधकामांवर हातोडा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने आज (गुरुवारी) पिंपळेगुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. आठ आरसीसी बांधकामे भूईसपाट करण्यात आली.

पिंपळेगुरवमधील प्रभाग क्रमांक 29 मध्ये अनधिकृत बांधकामे झाली होती. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने आज (गुरुवारी) या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली. त्यामध्ये पिंपळेगुरव परिसरातील आठ आरसीसी क्षेत्रफळ अंदाजे 5500 चौरस फूट अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

ड प्रभागाच्या पथकाने ही कारवाई केली. एक जेसीबी, एक डंपर, दहा मजूर यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.