Crime News : त्या नराधमाला फाशी द्या- किशोर आवारे; तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – माणुसकीला काळीमा फासणारी घटना कोथुर्णे मावळ येथे घडली. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी त्या नराधमाला भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात (Crime News) यावी, अशी मागणी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केली आहे.

 

Kalbhornagar : विजेचा धक्का लागून काळभोरनगरमध्ये एकाचा मृत्यू

 

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून आरोपी व आरोपीला मदत करणाऱ्या इतर संशयीत  आरोपींना त्वरित अटक करून फास्टट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात (Crime News) आले होते. यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, नगरसेवक किशोर भेगडे, निखिल भगत, सुनील कारंडे, सुनील उर्फ मुन्ना मोरे, मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, नगरसेविका अनिता पवार, संगीता दुबे, व इतर महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

 

 

आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देऊन सखोल चौकशीबाबत पाठपुरावा करण्यासाठी विनंती करण्यात आली. आंदोलनातील सर्व कार्यकर्त्यांनी व कोथूर्णे गावात जाऊन पीडीतेच्या कुटुंबीयांची व गावकऱ्यांची भेट घेतली. गावामध्ये वातावरण प्रक्षोभक असल्यामुळे गावकऱ्यांनी संयम ठेवून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन किशोर आवारे यांनी केले.तसेच मावळ तालुक्यातील पोलीसांनी गुन्ह्यातील आरोपीला लवकरात लवकर अटक केल्यामुळे पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.