Election News : हैदराबाद महापालिकेत त्रिशंकू स्थिती, ओवेसी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच धोबीपछाड!

भाजपची चार जागांवरून 49 जागांवर मुसंडी

एमपीसी न्यूज : ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने यंदा जबरदस्त कामगिरी करत महापालिकेच्या 150 जागांपैकी टीआरएसने 56 जागांवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावला.  भाजपने चार जागांवरून 49 जागांवर मुसंडी मारत अनेपक्षित विजय मिळवला आहे.

तर खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष 43 जागांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. ओवेसींना त्यांच्या बालेकिल्ल्यातच धोबीपछाड व्हावे लागले असून अवघ्या चार नगरसेवकांच्या जीवावर निवडणूक लढवणार्‍या भाजपने मात्र आश्चर्यकारक झेप घेतल्याने सर्वांच्यांच भुवया उंचावल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

हैदराबाद निवडणुकीत भाजप दुसर्‍या क्रमांकावर पोहोचली असून दक्षिणेकडील त्यांचे दरवाजे उघडले आहेत. ग्रेटर हैदराबाद पालिका देशातील सर्वात मोठ्या पालिकेपैकी एक आहे. एकूण चार जिल्ह्यात ही पालिका आहे. त्यात हैदराबाद, मेडचल- मलकाजगिरी, रंगारेड्डी आणि संगारेड्डी जिल्ह्यांचा समावेश आहे.

या चारही जिल्ह्यांमध्ये 24 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात तेलंगणाच्या लोकसभा सीटही येतात. त्यामुळेच पालिका ताब्यात घेण्यासाठी केसीआरपासून ते भाजप, काँग्रेस आणि ओवेसींनी जंगजंग पछाडले होते. मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा करत भाजप दुसर्‍या क्रमांकावर नेला.

हैदराबाद पालिकेसाठी यंदा 46.55 टक्के मतदान झाले. 2009 च्या पालिका निवडणुकीत 42.04 टक्के तर 2016 मधील निवडणुकीत 45.29 टक्के मतदान झाले होते. मात्र, गेल्या दोन निवडणुकांपेक्षा यंदा सर्वाधिक मतदान झाल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.